आमच्या गुरुवर्य श्री बापट सरांचे सहस्रचंद्र दर्शन
नाबाद 80 निमित्तानेअभिष्टचिंतन .....
प्रत्येक माणसाच्या जीवनात आईवडीलाप्रमाणे गुरूलाही मोठे आणि महत्वाचे स्थान आहे.अनेक सुभाषिते,श्लोक,सुविचारातून गुरूंची महति गायलेली आहे."गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा ....."हे तर सर्व दुनिया नेहमीच म्हणते.आज हे सर्व आठवायचे कारण म्हणजे कालच दि.१३ मार्चला पुण्याच्या पुण्याई सभागृहात आमचे सर नव्हे गुरु श्री घनश्याम विनायक बापट ह्यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित सहस्रचंद्रदर्शनाचा अभिष्टचिंतन सोहोळा मोठ्या दिमाखात आणि थाटामाटात पार पडला. आम्हा काही विद्यार्थ्यांचे भाग्य थोर असे की ह्या कौटुंबिक हृद्य सोहोळ्याला निमंत्रित असल्याने उपस्थित रहाता आले आणि आनंद घेता आला.श्री बापट सरांच्या बद्दल माझ्या आदरार्थी भावना गेल्या ५५/६० वर्षापासून आहेत तशाच आहेत. ह्यासंबंधी थोडेसे तुम्हा सर्वांना सांगितलेच पाहिजे म्हणून हा प्रपंच मांडलाय.
१९५८ साली मी पेण जिल्हा रायगड ( तत्कालीन कुलाबा ) येथील पेण प्रायव्हेट हायस्कूलमध्ये
इ.८ वीच्या वर्गात दाखल झालो.जुन महिन्यात शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच त्याच वर्षी नवीनच शिक्षक म्हणून रुजू झालेले श्री घनश्याम विनायक बापट सर आमच्या वर्गावर तास घ्यायला आले तेंव्हा त्यांनी त्यांचा विशेष परिचय करून दिला.सर मुळचे वाईचे असल्याचे कळल्यावर मला विशेष आनंद आणि आदर वाटू लागला.कारण मी सातारा /कोरेगावचा असल्याने नवे सर 'आपल्यातिकडचे' आहेत ह्या भावनेनेच उचल खाल्ली.तसेच भोरहून श्री पाटणकर म्हणूनही एक सर त्याच वर्षी शाळेत रुजू झाले होते. थोडक्यात दोन्हीही सर घाटावरचेच होते. पेण म्हणजे कुलाबा जिल्ह्याचे पुणे म्हणून ओळखले जात होते.गाव तालुक्याचे ठिकाण असले तरी राजकीय,साहित्यिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीपथावर होते.पहिल्या दिवशीच श्री बापट सरानी आपल्या वाणीने सर्वांवर अशी काही मोहिनी घातली की काही विचारू नका.त्यांची ती मोहिनी ६० वर्षानंतरही पेणच्या अनेक
विद्यार्थीवर्गावर एक गारुडचआहे.सर कोणताही विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवत.
पण इंग्रजी विषय शिकवण्यात सरांचा हातखंडा होता. आमच्या १० वी ब च्या वर्गाला सरानी जे इंग्रजी धडे आणि कविता शिकवल्या त्याची आठवण अजूनही आमच्या वर्गातील अनेकांना आहे.ह्यातच त्यांचे शिकविण्याचे कौशल्य,हातोटी सर्व काही आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार सर पुढे शाळेचे शालाप्रमुखही झाले. नंतर मी १९६२/६३ साली सातारच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये
ssc होण्यासाठी गेलो.त्यावेळी पेणच्या आठवणी,शाळेच्या आणि अनेक सरांच्या आठवणीने मन अस्वस्थ होई.अनेकाप्रमाणे मी बापट सरानाही पत्रे पाठवीत असे.आणि विशेष म्हणजे
ते पण पत्रोत्तर पाठवीत. १९६२/६३/६४ साली मला आलेली त्यांची पत्रे मी मर्म बंधातील ठेव म्हणून अजूनही जपुन ठेवली आहेत.काल त्यांच्या सत्कार् समारंभात अनेकजण त्यांच्याविषयी भरभरून बोलले. वाहत्या गंगेत मी पण हात धुवून घेतल्याशिवाय कसा राहू?त्यांचे गुणगान
गाताना त्यांची जीर्ण झालेली पत्रे सर्वाना दाखविली तेंव्हा सर्वजण चकीतच झाले. अध्यापना बरोबरच सर इतर बाबतीतहि लक्ष घालत आणि मार्गदर्शन करत.आम्ही ९ वी त असताना स्नेह्संमेलनात "देव माणूस "नाटक बसविले होते. त्याचे दिग्दर्शनही सरांनीच केले होते.त्याच वर्षी आमची सहल कोयना धरण, रायगड ,महाबळेश्वरला गेली असताना सरांनी सर्वांना त्यांच्या गावी म्हणजे वाईला गणपती आळीतल्या घरी नेले होते. शाळेचे वार्षिक नियतकालिक देखील सरांच्याच मार्गदर्शनाखाली निघे.२०१३ मध्ये शाळेत १९६३ ssc ग्रुपचे स्नेहमिलन झाले. मुख्य अतिथी अर्थातच श्री बापट सर होते. माझ्या विलेपार्ले येथील अत्रे साहित्य प्रदर्शनाला सर सहकुटुंब सहपरिवारे उपस्थित होते.त्यांनी माझे कौतुक करून नुसता आशीर्वाद न देता तोंड गोड करणारा खाऊहि आणला होता. किती आठवणी सांगू?
काल प्रथम धार्मिक विधी झाले.नंतर सुगम संगीताचा श्रवणीय कार्यक्रम.सरांचे बहुतेक सर्व नातेवाईकआवर्जून उपस्थित होते. आमचे जरी ते "सर'असले तरी कालमात्र ते कुटुंबियांचे
"श्याम "होते.इतके कौटुंबिक स्नेहाचे वातावरण असलेला सोहोळा पाहून आनंद वाटला.अनेक नातेवाईकांचे सत्कार, भेटवस्तू ,हारतुरे सर्व काही झाले. सरांच्या कन्येने खास भाषेत समारंभाचे ओघवते निरुपण/वर्णन केले.फोटो काढण्याची हौसहि अनेकांनी पुरी केली. नंतर खास मेनु असलेल्या चमचमीत खुसखुशीत,स्वादिष्ट भोजनाचा स्वाद सर्वांनी घेतला आणि यज्ञ कर्म उरकले.ह्यानिमित्ताने पेण,सातारा,वाईचे अनेक परिचित मला भेटले. ह्या सर्वाना
एकत्र गुंफले ते सरांच्या लोभस व्यक्तिमत्वाने.सरांच्या पत्नीनेपण त्यांना शालेय क्षेत्रात मोलाची साथ केल्याने अनेकांनी त्यांचेही गुणगान केले. सरांचा मुलगा सुनबाई मुलगी आणि जावईबापू
कार्यक्रम उंचीचा होण्यासाठी राबत होते.मी हे सर्वकाही टिपून ठेवत होतो.सर्वांची पाठवणी एक भेट वस्तू देऊन करण्यात आली.घरी आल्यावरही डोळ्यासमोरून तो सोहोळा धूसर होण्याची चिन्हे दिसत नव्हती.आता सरांच्या शताब्दीसाठी प्रार्थना आहे.
शुभप्रभात दि.15 मार्च @@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

गुरुर ब्रम्हा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर:
ReplyDelete