सरड्याची धाव कुंपणापर्यंत (अन माझी "सरड्या ":पर्यंतच )
मामाच्या शेताला जाऊ या ...जाऊ या
"अहा देश कसा छान/ माझे गेले देहभान /हिरवे हिरवे सारे रान/कुठे नागवेली पान/
कसा पिकला ग गहू हरभरा/हा शाळू मक्याचा तुरा/महाराष्ट्र देश सुंदरा "
आज ह्या शाहिरी काव्याची आठवण होण्याचे कारण म्हणजे मी नुकताच आमच्या आजोळच्या शेताला पहिल्यांदाच भेट देऊन आलो गहू हरभरा आणि शाळू मक्याचा तुरा म्हणजे काय आणि कसा असतो हे प्रत्यक्ष अनुभवले. पूर्वी मी ह्या सदरातच लिहिल्याप्रमाणे माझे आजोळ फलटण येथील फौजदार घराण्यातले आहे. आजोळी शेती जमीनजुमला असल्याचे आतापर्यंत केवळ ऐकले होते कारण सर्व जमीन सरकार दफ्तरी जमा होती.पण नुकतीच मायबाप सरकारने मूळ मालकांना त्या जमिनी परत केल्यामुळेच ते पाहण्याचे आणि हा लेख लिहिण्याचे भाग्य मला माझा मामेभाऊ श्री नंदू फौजदार ह्याच्यामुळे मिळाले.त्याचीच ही कहाणी ........
दिनांक ८ जानेवारीला मी आणि मामेभाऊ भल्या पहाटे( म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर झुंजूमुंजू होण्याच्या टायमाला ) पुण्याहून निघालो.जाम थंडी होती.तांबडं फुटलं नव्हतं.दिवे घाट गेल्यावर सासवड,जेजुरी वाल्हे ह्या शेतीच्या प्रांतातून जाताना,विविध प्रकारची झाडे पाने आणि फुले नेत्रसुख देत होती.फलटणला पोहोचताच आम्ही लगेच "सरडे "ह्या शेतजमीन असलेल्या गावाला जाणारी येष्टी पकडली.त्यामुळेच माझी धाव "सरड्या"पर्यंत होती.वाटेत राजाळे फाट्यावर उतरून पुढचा प्रवास मोटार सायकलने म्हणजेच फटफटीने करायचा होता पण सूर्य माथ्यावर आला
होता आणि पोटात कावळ्यांचा कोलाहल सुरु झाल्याने प्रथम पोटोबा शांत केला.न्याहरीचा बेत फक्कड होता. एका टपरीत तेथील" बारक्याने." थंडगार झालेली गर्रम गरम भजी आणि:" च्या" आमच्या पुढ्यात ठेवला.आम्हीही तो विषय लगेच हाता आणि तोंडावेगळा करून फटफटीवर स्वार
झालो. ४ किलोमीटरवरच फौजदारांची जमीन होती.प्रथम बांधावरूनच आजूबाजूला नजर टाकली.आणि "हिरवे हिरवे सारे रान "मी पाहू लागलो. शेती करणारे काही परिचित गावकरी मला "पाहुणा "म्हणून सर्व माहिती देत होते.समोरच हरभरा लावलेला दिसत होता.१०/१५ रुपयाला मिळणारी एकादी हरभ-याची पेंढी सटीसामासी विकत घ्यायची आणि एक फुल ग्लास उसाचा रस प्यायचा एवढाच काय तो माझा जिव्हाळ्याचा संबंध ह्या दोन पीकांशी होता.दात आणि दाढा ह्यांच्या दादागिरीमुळे उसाचं कांडे सोलून खाणे ही बाब इतिहासात जमा झाली होती.हरभ-याच्या शेतात आम्ही भराभरा फोटो काढून घेतले.आणि पीकाची पूर्ण पाहणी करून उसाकडे मोर्चा वळविला.
आता माझा' उसाचा तास' सुरु झाला होता.सर्वजण मनोभावे माहिती देत होते.प्रथम उसाची लागवड.बेणे म्हणजे लागण,मग खोडवा,निड्वा,तिडवा/रडवा आणि शेवटी मात्र भडवा.असा तो मनोरंजक प्रवास ऐकून हसून हसून बेजार झालो.येथील ऊंस साखर वाडीच्या कारखान्याला जात असे.त्यासाठी खास रेल्वे लाईन शेतापासून कारखान्यापर्यंत होती असे कळले.हे ग्रेटच वाटले.आमच्या गप्पा चालू असतानाच यजमानांनी स्वतः कोथिंबीर आणि मेथी तोडून आम्हाला आणून दिली.आणि'' गावरान" म्हणजे काय असते आम्हाला कळले. शहरात हा शब्द फारच गुळगुळीत झाला आहे.सरडे गाव अनेक वस्त्यामधून विखुरलेले असल्याने परतीच्या प्रवासाकडे आमचे लक्ष लागले होते.पण आजूबाजूचे दृश्य मात्र हिरवेगार आणि टवटवीत दिसत होते.कसलीच वर्दळ तेथे नव्हती'.सारे कसे शांत शांत ' वाटत होते.कर्णकरश्य होर्न ऐकायची सवय कानाला असल्याने अगदी चुकाल्यागत झाले.निरोप घेऊन येताना यजमानांनी त्यांच्या खास पर्णकुटीत आमचा पाहुणचार केला.ब-याच वर्षांनी';रामफळ ' खायला मिळाले. सीताफळ मुबलक असते पण रामफळ मात्र आपला आब राखून आहे.पर्णकुटीच्या आसपास अनेक प्रकारची फुलझाडे लावली आहेत.नारळाची झाडे,पेरू डाळिंब कडीपत्ता सगळं काही होते.जवळूनच पाण्याचे पाट वाहत होते.रांजणातील थंडगार पाणी प्याल्यावर एकदम तृप्त झालो.चहापान झाल्यावर आम्ही मोटारीच्या अड्ड्याकडे जायला निघालो तेंव्हा मेथी कोथीम्बिरीच्या पिशवीत पावटाही सामील झाला.
पायवाटेवरून जातानाही लक्ष शिवारामधील डोलणा-या पीकाकडे, सळसळन-या पानांच्या आवाजाकडे आणि गहूच्या पीकाकडे होते .पूर्णपणे ग्रामीण वातावरण होते.नकलीपणा आणि बडेजाव कोठेच दिसत नव्हता आमचं आहे हे असं आहे हे जाणवत होते.सरडे -फलटण बस मध्ये बसून आम्ही आमच्या शेतांना गुडबाय म्हटले.वाटेत एक खेडेगाव लागले त्याचे नाव होते "धुळदेव".
मला आतापर्यंत अनेक ' देव ' माहिती होते पण हा 'देव ' मात्र प्रथमच पहायला मिळाला.फलटण येथे आम्ही सद्गुरू उपळेकर काकांच्या समाधीचे दर्शन घेतले.शेजारील उपहारगृहाला भेट देऊन लगेच पुणे बस पकडली.गप्पा डुलकी सर्व व्यवस्थित पार पडले. येताना दिवे घाटातून पाणी नसलेला मस्तानी तलाव पहायला मिळाला. पुणे स्टेशनला उतरलो आणि कोथरूडला जाणारी तुडुंब गर्दीची बस पकडली. कलकलाट आणि आरडओरडा सुरु झाला पण माझे लक्ष मात्र 'हिरवे हिरवे सारे रान '
मध्येच गुंतले होते.अशी झाली आमची एक दिवसाची बागायती सफर.आजोळचा आणखी आगळावेगळा अनुभव आणि अत्यानंद देणारी.
शुभप्रभात :१० जानेवारी २०१५

No comments:
Post a Comment